October 26, 2025 12:14 PM October 26, 2025 12:14 PM
6
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन दोन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यासाठी रवाना
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज दोन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यासाठी रवाना झाले. सेशेल्सचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहतील. सेशेल्स हा भारताच्या ‘व्हिजन महासागर’ या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भागीदार असून, ही भेट सेशेल्स बरोबरची आपली भागीदारी आणखी दृढ करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.