December 8, 2024 3:44 PM December 8, 2024 3:44 PM

views 5

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संचलनात स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आ...

December 8, 2024 10:36 AM December 8, 2024 10:36 AM

views 4

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश असेल. यावेळी सात सैनिकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि एमआय१७ देखील संचलनात सामील होतील.