June 20, 2025 1:40 PM

views 30

कैलास मान सरोवर यात्रेला आजपासून सिक्कीम येथून सुरूवात

कैलास मान सरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू झाली. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नथु ला मधून जाणाऱ्या ३६ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या तुकडीत ४३ ते ६९ वर्ष वयोगटातले सदस्य असून त्यातल्या १३ महिला आहेत. ही तुकडी ११ ते १२ दिवसात यात्रा पूर्ण करुन गंगटोकला परत येईल. नथुला खिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरुंचं स्वागत केलं. तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे.

June 18, 2024 2:47 PM

views 34

सिक्कीम मध्ये पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका

सिक्कीम मधल्या चुंगथांग भागांत पूर स्थितीमुळं अडकलेल्या ५०० पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात सीमा रस्ते संघटन आणि मंगन जिल्हा प्रशासनाला आज यश आलं.अतिवृष्टी, खराब हवामान आणि भूस्खलनामुळं अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या परिस्थितीत सुद्धा सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं. इतर अडकलेल्या पर्यटकांची लवकरच हवाई मार्गानं सुटका करण्यात येईल,त्यासाठी सहा हेलिकॉप्टर्स बागडोगरा इथं तयार ठेवण्यात आली आहेत अशी माहिती, मंगन जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

June 17, 2024 2:43 PM

views 50

सिक्कीममध्ये अद्यापही अडकलेल्या सुमारे २ हजार पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू

सिक्कीमच्या पुरग्रस्त भागात अडकलेल्या सुमारे दोन हजार पर्यटकांना सुरक्षीतपणं बाहेर काढायला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या सर्व प्रवाशांना रस्तेमार्गे बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती मगन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेमुकमार छेत्री यांनी सांगितलं.