April 15, 2025 8:37 AM April 15, 2025 8:37 AM

views 10

सिंधुदुर्गमधल्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल जाहीर केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याला, 12 एप्रिल रोजी ३५८ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या चार किल्ल्यांबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात माहिती जनतेसमो...

February 4, 2025 4:02 PM February 4, 2025 4:02 PM

views 18

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात झाली ‘डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्प’ला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज ‘डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्प’ला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने घेतलेल्या या ५ दिवसांच्या निवासी शिबीराचं उदघाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जलदान करून झालं. मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यक शास्त्रातल्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरात जिल्ह्यातले २०० गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातले आघाडीचे संशोधक या विद...

August 30, 2024 2:03 PM August 30, 2024 2:03 PM

views 16

महाराष्ट्रात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यां; पुतळा पडल्या प्रकरणी एका आरोपीला अटक

सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली आहे. चेतन याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं. चेतन पाटील हा पुतळा बनवण्याचं कंत्राट दिल्या गेलेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून काम पाहात होता. या कंपनीचा मालक आणि पडलेल्या मुर्तीचा शिल्पकार जयदीप आपटे हा या प्रकरणातला दुसरा आरोपी असून, तो अद्यापही फरार आहे. 

August 27, 2024 3:43 PM August 27, 2024 3:43 PM

views 15

छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनानं भारतीय नौदलाशी समन्वय साधून १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजकोट इथं पुतळा जिथे कोसळला त्या ठिकाणाची पाहणी केली आणि त्याच जागी १०० फुटी पुतळा उभारण्यासंबंधी मुंबईला परतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करण्या-चं आश्वासन दिलं. या ...

August 27, 2024 8:42 AM August 27, 2024 8:42 AM

views 16

मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले असून त्यांनी शांतता आणि संयम बाळगावा, असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुतळ्याच्या परिसरात पोलीस तैनात केले आहेत. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्याव...

August 19, 2024 5:27 PM August 19, 2024 5:27 PM

views 22

आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचरा समुद्रात मासेमारी करणारी छोटी नौका उलटून आज तिघांचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट इथून मासेमारीला गेलेली छोटी नौका आचरा हिर्लेवाडी इथल्या समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एका खलाशानं पोहत किनारा गाठल्यानं तो बचावला.  

July 23, 2024 8:43 AM July 23, 2024 8:43 AM

views 22

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे आणि १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काल सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना काल सुट्टी जाहीर करण्यात...

July 8, 2024 5:52 PM July 8, 2024 5:52 PM

views 19

सिंधुदुर्ग : मुंबई – गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून तब्बल १४ तासानंतर मुंबई - गोवा महामार्गावरची पावशी इथली वाहतूक सुरळीत झाली. काल या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ चं एक पथक आज सकाळी कुडाळमध्ये दाखल झालं आहे.  दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी आज पूरग्रस्त गावांना भेट दिली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना यावेळी घेतलेल्या आढावा बैठकीत राणे यांनी प्रशासनाला दिल्या.  आमदार वैभव नाईक यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केल...

June 14, 2024 4:37 PM June 14, 2024 4:37 PM

views 29

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मतदारांची यादी निश्चित

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र २१ वरून ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. येत्या २६ जून रोजी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.