February 11, 2025 9:11 AM February 11, 2025 9:11 AM

views 7

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. धाराशिव इथं ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे राबवण्याची सूचनाही त्यांनी केली.

June 21, 2024 8:06 PM June 21, 2024 8:06 PM

views 7

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन

काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी विभागानं ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  जम्मू आणि काश्मीर सरकारनं बडगाम जिल्ह्यातल्या इच्चगाम तालुक्यात अडीच एकर जमीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तूसाठी प्रदान केली आहे. आता सदनाच्या वास्तूचं स्वरूप, त्यातल्या सोयी-सुविधा आणि आराखड्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात हो...