September 28, 2024 7:19 PM

views 25

पिंपरी चिंचवड, पनवेल, सातारा शहरांना माझी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार

राज्यात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई द्वितीय तर ठाणे महानगरपालिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसंच भूमी थीमॅटिक कॅटेगिरीत नवी मुंबई महानगरपालिका राज्यात सर्वोत्तम ठरली आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या गटात पनवेल महानगरपालिकेने प्रथम, अहमदनगर द्वितीय तर धुळे महानगरपलिकेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गटात सोलापूर महानगरपालिकेने सर्वोत्तम...

August 27, 2024 7:16 PM

views 28

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ...

July 22, 2024 7:37 PM

views 19

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिल...