February 7, 2025 10:45 AM February 7, 2025 10:45 AM

views 8

सांगलीत आजपासून ‘कृष्णामाई महोत्सवाचं’ आयोजन

सांगलीत आजपासून 'कृष्णामाई महोत्सवाचं' आयोजन करण्यात आलं आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ध्वजारोहण, शोभायात्रा, कृष्णामाई आरती, प्रवचन, भजन, कीर्तन, पथनाट्य, दीपोत्सव, चला जाणूया नदीला, जलपूजन, असे विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आयर्विन पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून कृष्णा नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

February 6, 2025 10:45 AM February 6, 2025 10:45 AM

views 8

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 वर्षांखालील 98 लाख मुलांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील 70 हजार शाळांमधील 18 वर्षे वयापर्यंतच्या 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 164 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जन्मत: असलेलं व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि इतर अपंगत्व इत्यादींचं वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमात निश्चित केलं आहे. राज्यातील 18 वर्षांपर्यंतच्या साधारण 2 कोटी मुलांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. अंगणव...

July 31, 2024 3:25 PM July 31, 2024 3:25 PM

views 13

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली असून ३४ पूर्णांक ४० टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. कोयना धरणातून ४२ हजार १०० क्यूसेक इतका, वारणा धरणातून ८ हजार ९२ हजार क्यूसेक तर अलमट्टी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. सांगली जिल्ह्यात काल १५ पूर्णांक ९ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५३ पूर्णांक ५ दशांश मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.