February 3, 2025 11:25 AM February 3, 2025 11:25 AM

views 7

सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानं...