February 11, 2025 2:08 PM February 11, 2025 2:08 PM

views 3

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक

देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. या वाढीमुळे आज २४ कॅरेट सोने ८७ हजार रुपयांच्या तर २२ कॅरेट सोने देखील ८० हजार रुपयांच्या पातळीवर पोहचलं आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार २२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९ हजार ९६० रुपये इतका आहे. मुंबईच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७ हजार ७० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९ हजार ८१० रुपये इतका आहे. चांदीच्या किमतीत मात्...