June 21, 2024 7:19 PM June 21, 2024 7:19 PM
14
जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम पुढे नेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाजमाध्यमावर दिली. नागपूर-गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात ते बोलत होते. हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसंच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, असं ते म्हणाले. समृध्दी महामार्ग हा प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचीही फेरआखणी करता येईल का, याच...