February 6, 2025 4:16 PM February 6, 2025 4:16 PM
7
अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतूून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, तसंच घोषणाबाजी केली. याआधी काँग्रेसने या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. यावर हे प्रकरण परकीय राष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सभागृह सुरळित चालू द्याव...