April 5, 2025 11:21 AM April 5, 2025 11:21 AM

views 13

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं रिजीजू यांचं प्रतिपादन

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. अधिवेशनानंतर वार्ताहरांशी बोलताना रिजीजू यांनी वक्फ विधेयकावर सर्वात दीर्घ चर्चा झाली तसंच त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला नाही असं नमूद केलं.  

April 5, 2025 8:26 AM April 5, 2025 8:26 AM

views 25

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित; दोन्ही सभागृहांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक कामकाज

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. 31 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात, लोकसभेत 118 टक्के काम झालं आणि 16 विधेयकं संमत झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. तर राज्यसभेत या अधिवेशन काळात 119 टक्के कामकाज झालं; आणि 14 विधेयकं संमत झाली असं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. अधिवेशनात भरीव कामकाज झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत 14 तास, तर राज्यसभेत 17 तास चर्चा झाली, चर्चेदरम्यान एकदाही व्यत्यय आला नाही, असं रिजीजू यांनी सां...

February 6, 2025 4:16 PM February 6, 2025 4:16 PM

views 7

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतूून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली, तसंच घोषणाबाजी केली. याआधी काँग्रेसने या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. यावर हे प्रकरण परकीय राष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सभागृह सुरळित चालू द्याव...

September 27, 2024 1:41 PM September 27, 2024 1:41 PM

views 9

संसदेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तुहरी महताब यांची नेमणूक

संसदेच्या आर्थिक विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भर्तुहरी महताब यांची तर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर यांची नेमणूक झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग हे संरक्षण विषयक तर राधा मोहन दास अग्रवाल गृहविषयक समितीचे अध्यक्ष राहणार आहे. सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, श्रीरंग बारणे यांची ऊर्जा विषयक समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. याशिवाय इतरही अनेक समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक झाली आहे. 

July 29, 2024 4:58 PM July 29, 2024 4:58 PM

views 23

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 22, 2024 9:40 AM July 22, 2024 9:40 AM

views 19

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हटलं.   अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, जे...

July 2, 2024 7:59 PM July 2, 2024 7:59 PM

views 18

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.