October 15, 2024 10:04 AM October 15, 2024 10:04 AM

views 15

केंद्रीय गृहमंत्री आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव गृहमंत्र्यांना सांगणार आहेत. तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल याचं अमित शहा त्यांना मार्गदर्शन करतील. भारतीय पोलीस सेवेच्या 2023 च्या तुकडीत 54 महिला अधिकाऱ्यांसह एकंदर 188 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.