October 15, 2024 12:15 PM October 15, 2024 12:15 PM
7
नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला शेतकरी आसूड मोर्चा
नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावं, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.