October 26, 2024 8:02 PM

views 26

दुर्गम भागातल्या नागरिकांना मतदान करता यावं यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्गम भागातल्या आणि योग्य संपर्क यंत्रणा नसलेल्या नागरिकांना मतदान करता यावी यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. अशा प्रकारच्या मतदान केंद्रांना शॅडो मतदान केंद्रं असं म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ तर सांगलीत केवळ एकच शॅडो मतदान केंद्र असेल. ही शॅडो मतदान केंद्रं २४ जिल्ह्यांमध्ये असून यामध्ये मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असतील. त्यात विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ हे उच्च क...