July 10, 2024 5:55 PM July 10, 2024 5:55 PM

views 13

पालघर शिवसेना उपनेते राजेश शाह यांना शिवसेनेतून काढलं

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मृत महिलेच्या पतीची भेट घेऊन सांत्वन केलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करत त्यांनी याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप हो...

June 17, 2024 1:43 PM June 17, 2024 1:43 PM

views 11

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादाची घुसखोरी-मुख्यमंत्र्यांचा आरोप

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादानं घुसखोरी केल्याचा आरोप मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी विजय संकल्प मेळावा काल झाला, त्यात मुख्यमंत्री बोलत होते. याच संस्थांच्या सहाय्याने महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत खोटं नरेटिव्ह निर्माण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचं खरं नरेटिव्ह निर्माण करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.