October 21, 2024 8:40 AM

views 21

कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार

कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली.   शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल...

June 15, 2024 1:31 PM

views 38

शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गंत येत्या १८ जूनला ९ कोटी ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १८ जूनला एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली. नवी दिल्लीत बातमीदारांशी ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख कोटी रुपये हस्तांतरित केल्याचंही चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र...