April 1, 2025 9:38 AM April 1, 2025 9:38 AM

views 13

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नाईट लॅंडींगला सुरुवात

शिर्डी इथल्या श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या अर्थात नाईट लॅंडींग सेवेचा प्रारंभ गुढी पाडाव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. इंडिगो कंपनीच्या विमानानं यावेळी यशस्वी लँडिंग केलं. कंपनीचे अधिकारी आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.