September 24, 2024 8:39 PM September 24, 2024 8:39 PM
18
तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली. यात पंढरपूरमधे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप आणि दर्शन रांगेची सुविधा निर्माण करण्यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. त्याशिवाय जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानासाठी २५ कोटी, सातारा जिल्ह्य...