August 27, 2024 8:40 AM

views 21

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण बसवले जाणार

राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणं बसवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्याचं काम तातडीनं पूर्ण करणार असून पोलिसांच्या उपस्थितीत या पेट्या उघडण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

July 3, 2024 5:25 PM

views 14

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही- मंत्री दीपक केसरकर

पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. अशा शाळांचं एकत्रीकरण करून समूहशाळा सुरू करण्याची तरतूद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे, मात्र, तसं काही करण्याचं सरकारचं धोरण नाही. अशा शाळांचं फक्त सर्वेक्षण सुरू आहे, आदिवासी भागांमधल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.  जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती पूर्ण झाली असून, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा भरण...

June 15, 2024 10:07 AM

views 29

उन्हाळी सुट्यानंतर शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ

उन्हाळी सुट्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा, बालवाड्या, १६ जिल्हा परिषदेच्या शाळा आणि ९५ खासगी अनुदानित शाळांमधल्या ३८ हजार विद्यार्थ्यांना आज नियमित पोषण आहारासोबतच मिठाई देण्यात येणार आहे.