December 12, 2024 9:10 AM

views 53

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात साडेतीन लाख पुणेकर सहभागी

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत'उपक्रम काल राबवण्यात आला. साडेतीन लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले. हा प्रतिसाद पाहता आगामी पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यासह राज्य, देश आणि परदेशातूनही या उपक्रमात सहभाग नोंदवण्यात आला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शि...