December 5, 2024 2:39 PM

views 19

झारखंड मध्ये विस्तारीत मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा आज रांचीत शपथविधी

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीच्या सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी आज रांची इथं होणार आहे. राज्यपाल संतोषकुमार गंगवार अकरा मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे चार, काँग्रेसचे चार, तर राष्ट्रीय जनता दलाच्या एका मंत्र्याचा समावेश असेल.

December 4, 2024 11:42 AM

views 23

राज्यात उद्या होणार नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा

राज्यात नवनिर्वाचित महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी काल महायुतीतल्या नेत्यांनी केली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

June 23, 2024 3:21 PM

views 25

१८व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होणार

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.  लोकसभा सभापतीपदासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक होणार आहे.  राज्यसभेचं अधिवेशन येत्या २७ तारखेला सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर होईल. हे  अधिवेशन ३ जुलै पर्यंत चालेल.