August 27, 2024 7:25 PM August 27, 2024 7:25 PM
16
नेपाळ बस दुर्घटनेतल्या जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत करणार
नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने नेपाळहून मुंबईत आणण्यात आलं. यात भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या एकूण ७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उद्या आणखी ४ जखमींना मुंबई आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.