November 9, 2024 11:35 AM November 9, 2024 11:35 AM

views 9

वैद्यकीय उपकरणनिर्मिती उद्योगासाठी केंद्र सरकारची 500 कोटींची योजना

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्यासाठीच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचं उद्धघाटन केलं. ही योजना देशाला वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात स्वावलंबी बनवेल आणि या क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. ही नवी योजना 500 कोटी रुपयांची असून, यात वैद्यकीय उपकरण क्लस्टरसाठी सुविधा, क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास, आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना, क्लिनिकल अभ्यास कार्यक्रम आणि वैद्यकीय उपकरणा...