June 21, 2024 2:39 PM June 21, 2024 2:39 PM

views 19

तमिळनाडूमध्ये कल्लाकुरिची इथं विषारी दारूचं सेवन केल्यानं ४७ जणांचा मृत्यू

तमिळनाडू च्या कल्लाकुरीची इथल्या विषारी दारु सेवन केल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता ४७ झाली आहे. या विषारी दारुमुळे एकूण १६५ जण बाधित झाले होते. यातील ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून इतर बाधितांची तब्येत सुधारत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.एस. प्रसथं यांनी दिली. या प्रकरणी अटक केलेल्या चार दोषींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.   मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख तर उपचार घेत असलेल्यांना प्रत...