February 5, 2025 10:36 AM February 5, 2025 10:36 AM

views 12

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे तत्कालिन कृषीमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली. ते म्हणाले... ‘‘शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. या राज्य सरकारने ताबडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात अधिवेशन हे अधिवेशन धनंजय मु...

October 18, 2024 8:37 PM October 18, 2024 8:37 PM

views 7

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्या या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य न...