October 19, 2024 11:00 AM October 19, 2024 11:00 AM

views 15

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू क्रिकेट कसोटीच्या कालच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा केल्या. न्यूझीलंडकडे सध्या 125 धावांची आघाडी आहे. भारताकडून विराट कोहली आणि सरफराज खान यांनी प्रत्येकी 70 धावा तर रोहित शर्माने 52 धावा करत भारताचा डाव सावरला. तत्पूर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा करून मोठी आघाडी घेतली होती.