July 13, 2024 3:17 PM
16
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जास्मिन पाओलिनीची लढत बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ७व्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत ३१व्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार आहे.चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्रवेश केला.इटलीच्या पाओलिनीनं उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या डोना वेकिकचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं आहे.पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या नोव्हाक जोकोविच आणि गतविजेता कार्लोस अल्काराझ य...