June 13, 2025 1:48 PM June 13, 2025 1:48 PM

views 13

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातले पाच जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे पवईचे रहिवासी होते. तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते. डोंबिवली इथल्या रोशनी सोनघरे, पनवेलच्या मैथिली पाटील आणि गोरेगाव, मुंबई इथल्या अपर्णा महाडिक हे कर्मचारीही विमानात होते. सांगली जिल्ह्यातले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार हे प्रवासीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.  

August 10, 2024 2:01 PM August 10, 2024 2:01 PM

views 15

ब्राझीलमधल्या प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधल्या साओ पाऊलो शहराजवळ आज एक प्रवासी विमान कोसळून ६१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमानात ५७ प्रवासी आणि चार कर्मचारी प्रवास करत होते. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांविषयी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनसीयो लुला डीसिल्वा यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.