January 16, 2025 1:48 PM

views 17

केंद्रीय गृहमंत्री आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होणार आहे. या यंत्रणेनुसार प्रवाशांना ftittp.mha.gov.in या संकेतस्थळावर त्यांचे तपशील भरावे लागतील आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करावी लागतील. नोंदणीकृत प्रवाशांचे बायोमेट्रिक तपशील परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयांम...