April 9, 2025 3:10 PM April 9, 2025 3:10 PM

views 10

अमरावती विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार

अमरावती विमानतळाचं काम पूर्ण झालं असून या विमानतळावरून पहिलं विमान येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. त्याआधी त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधऱ मोहोळ हे विमानतळाचं लोकार्पण करतील तसंच अमरावती ते मुंबई प्रवास करतील.