July 4, 2024 11:45 AM July 4, 2024 11:45 AM

views 8

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाणार

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल, तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान, संत मुक्ताबाईंच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. शहरात माळीवेस इथल्या हनुमान मंदिरात मुक्ताईंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या आहेत. आज ही पालखी पेठ बीड भागातल्या बालाजी मंदिरात पोहोचणार आहे. अंमळनेर इथल्या संत सखाराम महाराज यांची दींडी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद ...