October 18, 2024 9:02 PM

views 47

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी

आसाम आणि बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आसामध्ये विधानसभेच्या पाच जागांसाठी आणि बिहारमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर आज नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमध्ये इमामगंज, बेलागंज, रामगढ आणि तरारी या चार विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.