October 3, 2024 8:03 PM October 3, 2024 8:03 PM

views 14

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ टप्प्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ६३ पूर्णांक ८८ शतांश टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. येत्या मंगळवारी मतमोजणी होणार आहे.    जम्मू आणि काश्मीरमध्ये या वर्षअखेरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी, विधानसभा निवडणुकीदरम्यान तैनात केलेला बंदोबस्त डिसेंबरपर्यंत कायम ठेवला जाणार आहे.  

October 2, 2024 8:10 PM October 2, 2024 8:10 PM

views 7

हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार

हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार आज शिगेला पोहोचला. विविध राजकीय पक्षांच्या प्रचारसभा झाल्या. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भिवानी जिल्ह्यात भवानी खेरा आणि  जिंद जिल्ह्यात जुलाना इथं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी छाकरी दादरी इथं प्रचारसभा घेतल्या.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार हेमा मालिनी यांनी कुरूक्षेत्रातल्या तीन मतदारसंघात प्रचार केला. आमआदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनिष सिसोदिया यांनी हिसार आणि अधमपूरमध...

September 27, 2024 2:37 PM September 27, 2024 2:37 PM

views 7

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात ४० मतदारसंघांमधे येत्या १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे की, विविध राजकीय पक्षांनी प्रचारसभा, आणि रोड शोचा धडाका लावला आहे. मतदारांशी वैयक्तिक भेटून प्रचारावरही भर दिला जात आहे. भाजपाचे प्रमुख प्रचारक, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा उद्या जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियममधे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या...

September 24, 2024 8:21 PM September 24, 2024 8:21 PM

views 18

रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसंच निवडणुक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ एस. एस. संधू यांनी आज रांचीमधे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीत धनशक्तीचा वापर खपवून घेतला जाणार नाही,असं निवडणुक आयोगानं यावेळी राज्यातल्या तसंच केंद्रीय यंंत्रणांना बजावलं. आयोगानं आज राजकीय पक्ष, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संबधितांच्या बैठका घेतल्या. निवडणुका प्रलोभनमुक्त व्हाव्यात, याची काळजी घेण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी बातमीदारांना सांगितलं.  &nbsp...

August 27, 2024 8:25 PM August 27, 2024 8:25 PM

views 18

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडची अंतिम मतदार यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या राज्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही यादी तयार केली असून, अंतिम यादीनुसार २ कोटी ५७ लाख ७८ हजार १४९ मतदारांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ६५ हजार ४४९ पुरुष मतदार आहेत. १८ ते १९ वर्ष वयोगटातल्या मतदारांची संख्या १० लाख ७४ हजार ७३२ आहे.

August 27, 2024 8:23 PM August 27, 2024 8:23 PM

views 4

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं तिसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. यादीत २९ उमेदवारांचा समावेश असून त्यात देविंदरसिंग राणा, पवन गुप्ता, अब्दुल गनी चौधरी आणि बलदेव राज शर्मा यांना संधी मिळाली आहे.