November 10, 2024 8:59 AM November 10, 2024 8:59 AM

views 115

मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार

विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून, मतदान करण्यासाठी, मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आ...

October 28, 2024 6:51 PM October 28, 2024 6:51 PM

views 9

काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत राजगृह इथं हा पक्ष प्रवेश झाला. अनिस अहमद यांना वंचित बहुजन आघाडीने नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

October 28, 2024 6:48 PM October 28, 2024 6:48 PM

views 15

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून शरद मैंद, तर सिंदखेडा इथून संदीप बेडसे निवडणुकीच्या रिंगणात असतील.

October 28, 2024 6:45 PM October 28, 2024 6:45 PM

views 12

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आणखी २५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. वर्सोव्यातून भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, सावनेरमधून आशिष देशमुख यांच्यासह इतरांची नावं यात आहेत. बोरीवलीतून संजय उपाध्याय, कारंज्यातून सई डहाके, वसईतून स्नेहा दुबे, लातूरमधून अर्चना पाटील- चाकूरकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपानं आतापर्यंत १४६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपानं संतुक हंबर्डे यांचं नाव जाहीर केलं आहे.

October 26, 2024 3:30 PM October 26, 2024 3:30 PM

views 3

उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत; ३० ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

October 26, 2024 3:28 PM October 26, 2024 3:28 PM

views 15

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. २३ उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी-मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आणि शीव-कोळीवाडा मतदारसंघातून गणेश यादव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रूपाली पाटील, शिवडीतून अजय चौधरी तर भायखळ्यातून मनोज ...

October 21, 2024 8:35 AM October 21, 2024 8:35 AM

views 12

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर बल्लारपूरमधून मंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपानं काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.   मुंबईत, वांद्रे पश्चिम मधून आशीष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राह...

October 20, 2024 6:52 PM October 20, 2024 6:52 PM

views 10

आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून आतापर्यंत अवैध वस्तू आणि रोख रकमेच्या स्वरुपात सुमारे ३ कोटी १५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के रवीकुमार यांनी अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत

October 18, 2024 9:19 AM October 18, 2024 9:19 AM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दोन दिवसांची मुदत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. उद्या १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून, निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी.     ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही, त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन, मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस....

October 3, 2024 8:15 PM October 3, 2024 8:15 PM

views 8

हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आज प्रचारासाठीच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला. भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जींद जिल्ह्यात तीन ठिकाणी जन आशीर्वाद रॅलीत सहभागी होत, भाजपा उमेदवारांसाठी मतं मागितली. भाजपाच्या शहाबाद इथल्या प्रचारसभेत खासदार नवीन जिंदाल सहभागी झाले होते.  काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार दीपेंद्र हुड्डा, राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सि...