October 27, 2024 1:56 PM October 27, 2024 1:56 PM

views 12

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.    काँग्रेसच्या यादीत १६ नावांचा समावेश आहे. यात दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना, तर अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर ...

October 19, 2024 1:05 PM October 19, 2024 1:05 PM

views 16

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा जाहीर

 झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते राहुल गाधी आज रांची इथं पोहोचत असून ते यावेळी सहयोगी झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादवही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी बैठक करणार आहेत.   राष्ट्रीय लोकशाही दल अर्थात एनडीएचा जागावाटपाचे सूत्र ठरले असून भाजपा ६८ जागांवर तर इतर मित्र पक्ष उर्वरित जागांवर निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदा...

October 18, 2024 7:32 PM October 18, 2024 7:32 PM

views 14

निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पाडण्याकरता आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. आचारसंहिता संपेपर्यंत परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात धरणं आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   मुंबईत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं सुमारे ७ हजार ३८९ भित्तीपत्रकं, फलक, झें...

October 15, 2024 3:58 PM October 15, 2024 3:58 PM

views 17

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २६ तारखेला तर झारखंडचा जानेवारीच्या ५ तारखेला संपणार आहे. २०१९मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन २४ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. त्यावेळी ६१ पूर्णांक ४ शतांश टक्के मतदान झाल...

October 9, 2024 11:10 AM October 9, 2024 11:10 AM

views 14

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली इथं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकार्यांनी निवडणुकीच्या घोषणेपासून ते मतदानाचा निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कामाचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

October 1, 2024 8:31 PM October 1, 2024 8:31 PM

views 13

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६५ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ४० विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी २४ जम्मू विभागात तर १६ काश्मीरमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या टप्प्यात सर्वाधिक ७२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान उधमपूरमध्ये झालं आहे.    जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरला पहिल्या तर  २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात...

October 1, 2024 9:41 AM October 1, 2024 9:41 AM

views 16

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.

July 9, 2024 3:41 PM July 9, 2024 3:41 PM

views 14

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. 

July 4, 2024 11:32 AM July 4, 2024 11:32 AM

views 8

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर

महाराष्ट्रात, आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यावर निवडणूक आयोगाचा भर राहील. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या स्वयंसेवकांना पात्र मतदारांची नावे अद्ययावत करण्याचे आणि सोसायटी सोडून गेलेल्या किंवा सोसायटीतील मृत व्यक्तींची नावे काढून टाकण्याचे काम दिले जाई...