December 8, 2024 10:06 AM December 8, 2024 10:06 AM

views 8

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शपथग्रहण प्रक्रिया सुरू

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वप्रथम चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशिष जयस्वाल या नवनिर्वाचित आमदारांना, तालिका अध्यक्ष म्हणून सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. इतर आमदारांच्या शपथग्रहणानंतर सभागृहाचं कालचं कामकाज तहकूब झालं. उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ देण्यात येईल. दरम्यान, विधानसभा अध्...

July 25, 2024 11:22 AM July 25, 2024 11:22 AM

views 9

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर

बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा – गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी यांनी हे विधेयक सादर केलं.

July 13, 2024 3:05 PM July 13, 2024 3:05 PM

views 25

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. १० जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचा निकाल घोषित झाला असून इथं आम आदमी पार्टीचे मोहिंदर भगत हे विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशमधल्या देहरा मतदारसंघात काँग्रेसचे कमलेश ठाकुर जिंकले आहेत. इतर मतदारसंघांचे कल स्पष्ट झाले असून पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकताल या चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तराखंडमधल्या ...

July 12, 2024 8:35 PM July 12, 2024 8:35 PM

views 12

महायुती सरकारने कर्ज आणून नव्या योजना आणल्या- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

महायुती सरकारने सरकारी तिजोरीत खडखडाट केला, कर्ज आणून नव्या योजना आणल्या असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना केला. मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयऱ्याना आरक्षण देण्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं ते म्हणाले. राज्यात सरकारने दावा केल्याप्रमाणे रोजगानिर्मिती झालेली नाही. लोकांच्या या फसवणुकीला जनतेच्या दरबारात तोंड द्यावं लागेल, असं वडेट्टीवार म्हणाले.  चातुर्वर्ण्य या राज्यात पुन्हा येता कामा ...

July 9, 2024 7:07 PM July 9, 2024 7:07 PM

views 16

विनियोजन विधेयक विधिमंडळात मंजूर

विनियोजन विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. त्यापूर्वी महसूल, वनं, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, तसंच महिला आणि बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक मांडलं. त्यावर बोलताना, हे सरकार अस्तित्वात असताना दोन - दोन वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची गरज नव्हती, असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. ही परंपरा होऊ नये याची काळजी घ्यावी असं ते म्हणाले.  त्यावर यापूर्वी २०१४, आणि २०१९ साली देखील असंच झालं होतं, असं उपमुख्यम...

July 9, 2024 6:35 PM July 9, 2024 6:35 PM

views 20

९४ हजार ८८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर

राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर अवघ्या काही मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकंदर ९४ हजार ८८९ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. यामध्ये, याच अतिरिक्त अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. सर्वाधिक, २६ हजार २७३ कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या मागण्या महिला आणि बालहक्क विकास विभागाच्या, तर त्याखालोखाल, १४ हजार ५९५ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मागण्या नगर विकास विभागाच्या आहेत.  विधानसभा निवडणुकीत...

July 9, 2024 2:08 PM July 9, 2024 2:08 PM

views 13

महाराष्ट्रात पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रणासाठी वेगळा कायदा करण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई या संबंधी देखील तरतूद असेल. कायदा आणण्यासाठी विलंब झाला तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल, असंही मंत्री सामंत म्हणाले. मुंबईतल्या बेस्ट बस आणि इतर सुट्या भागांची भंगार विक्री...

July 3, 2024 7:04 PM July 3, 2024 7:04 PM

views 13

भुशी धरणात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा

पाणीटंचाई असणाऱ्या शहरात विकासकाला पर्यायी पाण्याची सोय करण्याच्या, हे खरेदीदाराला करारपत्रात लिहून देण्याच्या आणि हे ‘रेरा’ला कळवण्याच्या सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. चेतन तुपे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. पाणी वितरण व्यवस्था नव्याने तयार करून, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, असंही फडनवीस म्हणाले.  भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ...

July 2, 2024 5:27 PM July 2, 2024 5:27 PM

views 12

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत – मुख्यमंत्री

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ वयापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजूर झाला.

July 2, 2024 3:56 PM July 2, 2024 3:56 PM

views 18

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी – मंत्री अतुल सावे

परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली झोपड्यांची हस्तांतरणं मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नसल्यामुळे मुंबईतल्या बहुसंख्य झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दर्शवली. याबाबत अध‍िवेशन काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक उच्च स्तरीय बैठक बोलावण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.