July 13, 2024 8:24 AM July 13, 2024 8:24 AM
11
महायुती सरकारनं लक्षणीय कामगिरी केल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
दोन वर्षात राज्यातल्या महायुती सरकारनं रखडलेले प्रकल्प मार्गी लावत सर्वच क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते. सिंचन, मागेल त्याला सौरपंप, ८४ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे,या कामांचा उल्लेख फडणवीस यांनी केला. धारावीचा पुनर्विकास करताना तिथल्या व्यावसायिकांनाही व्यवसाय करण्यासाठी तिथेच जागा देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केलं. ...