October 5, 2024 8:28 PM October 5, 2024 8:28 PM

views 12

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेश

निर्जनस्थळी गस्त वाढवण्यासह पोलिसांना दक्ष राहण्याचे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. पुण्यात पोलिसांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी प्रकाश झोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी, अशा सूचना गोऱ्हे यांनी दिल्या.

July 12, 2024 8:16 PM July 12, 2024 8:16 PM

views 31

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी

विधान परिषदेच्या आज झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या ३ पैकी २ उमेदवारांना विजय मिळवता आला.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत झाले. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी आज विधान सभेच्या सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. त्यातून भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे विजयी झाले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून...

July 9, 2024 5:06 PM July 9, 2024 5:06 PM

views 17

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मागण्यांचं निवेदन केलं सादर

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचं सभापती पद हे गेले अडीच वर्ष रिक्त आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासारखं संवैधानिक पद रिक्त असणं लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी याच अधिवेशनात तारीख जाहीर करावी, अशी विनंती शिष्टमंडळानं केली.

July 9, 2024 3:31 PM July 9, 2024 3:31 PM

views 16

नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन

राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं...

July 9, 2024 3:22 PM July 9, 2024 3:22 PM

views 17

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदे एकमतानं मंजूर

मुंबईतल्या रेल्वेमार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं आज एकमतानं मंजूर केला. मध्य रेल्वेमार्गावरच्या करी रोड स्थानकाचं नाव लालबाग स्थानक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरच्या सॅन्डहर्स्ट स्थानकाचं नाव डोंगरी स्थानक, पश्चिम रेल्वेमार्गावरच्या मरीन लाइन्स स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी स्थानक, तर चर्नी रोड स्थानकाचं नाव गिरगाव स्थानक करण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे.  तसंच हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन स्थानकाचं नाव काळा ...

July 9, 2024 2:46 PM July 9, 2024 2:46 PM

views 14

विधानपरिषदेत झाला सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या नियमित सत्रात आज सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमदारकीची शपथ दिली. राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातील अन्य विषयांबाबत शिफारसी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाह...

July 3, 2024 7:57 PM July 3, 2024 7:57 PM

views 17

राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव आज विधानपरिषदेनं एकमताने मंजूर केला. तत्पूर्वी, या प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी उत्तर दिलं. राज्याची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून गुंतवणुकीच्या बाबतीतही राज्य अग्रेसर आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्धा ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला आहे आणि एक ट्रिलियन डॉलरचं ध्येय पुढच्या ३ ते ५ वर्षांत गाठण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक आराखडा तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुती सरकारनं नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं र...

July 2, 2024 7:27 PM July 2, 2024 7:27 PM

views 14

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला विधानपरिषदेत मंजुरी

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला आज विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवर तीन अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.   

July 2, 2024 7:19 PM July 2, 2024 7:19 PM

views 25

अंबादास दानवे यांचं निलंबन हा एकतर्फी, आणि लोकशाहीविरोधी निर्णय असल्याची उद्धव ठाकरे यांची टीका

विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे एकतर्फी असून हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं, दोन्ही बाजू मांडू देणं आवश्यक असतं. मात्र दानवेंना बाजू मांडायला वेळ दिली गेली नाही, असं ठाकरे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीतला आपला विजय झाकोळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला असून षडयंत्र रचून दानवे यांना निलंबित केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.

July 2, 2024 6:49 PM July 2, 2024 6:49 PM

views 16

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. यावर विरोधकांनी हौद्यात उतरून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. य...