February 3, 2025 10:53 AM February 3, 2025 10:53 AM
9
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने पटकावले टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद
बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने काल रात्री टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रोमहर्षक लढतीत त्याने सध्याचा विश्वविजेता डी. गुकेशवर विजय मिळवला. विश्वनाथन आनंदनंतर प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेश आणि प्रज्ञानंद दोघेही 13 फेऱ्यांनंतर साडेआठ गुणांसह बरोबरीत होते.