June 17, 2024 1:43 PM June 17, 2024 1:43 PM

views 11

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादाची घुसखोरी-मुख्यमंत्र्यांचा आरोप

राज्यात काही सामाजिक संस्थांमध्ये शहरी नक्षलवादानं घुसखोरी केल्याचा आरोप मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी विजय संकल्प मेळावा काल झाला, त्यात मुख्यमंत्री बोलत होते. याच संस्थांच्या सहाय्याने महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत खोटं नरेटिव्ह निर्माण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचं खरं नरेटिव्ह निर्माण करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं.