July 11, 2024 4:20 PM July 11, 2024 4:20 PM
14
१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवणार – तानाजी सावंत
देशाला २०२५ सालापर्यंत क्षयमुक्त करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. २०२२ साली राज्यात २ लाख ३३ हजार ८७२ क्षय रोग रुग्ण होते, तर मुंबईत ६५ हजार ४३२ क्षय रुग्ण होते, अशी माहिती देखील मंत्री सावंत यांनी दिली. अंगणवाड्या उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्या...