June 14, 2024 2:52 PM June 14, 2024 2:52 PM
21
सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडियावर तक्रारी नोंदवल्या. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींना पोलिसांनी उत्तर देत त्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनांचे बिघाड आणि इतर समस्यांमुळे वडाळा, आझाद मैदा...