August 24, 2024 8:46 AM August 24, 2024 8:46 AM

views 12

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वातावरण तयार झाल्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.

July 6, 2024 6:05 PM July 6, 2024 6:05 PM

views 14

चीनच्या हेझ शहरात झालेल्या वादळामुळे पाच जणांचा मृत्यु तर ८८ जण जखमी

चीनच्या शॅडोन्ग परगण्यातल्या हेझ शहरात झालेल्या जोरदार वादळामुळे पाचजण मृत्युमुखी पडले तर ८८ जण जखमी झाले. डोन्गमिन्ग आणि ज्युआनचेंग या भागांना वादळाचा तडाखा बसल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. यात २ हजार ८२० घरांची पडझड झाली तर ४ हजार ६० हेक्टर पिकं आणि ४८ वीजपुरवठा केंद्राचं नुकसान झालं. नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. रस्ते वाहतूक आणि संपर्कव्यवस्था प्रामुख्याने पूर्वपदावर आणल्याचं त्यांनी कळवलं आहे.