April 15, 2025 3:45 PM

views 23

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन २ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन २ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर फेब्रुवारीत २ पूर्णांक ३८ शतांश टक्के इतका होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. घाऊक किंमत निर्देशांकातल्या गरजेच्या वस्तूंवरचा वार्षिक महागाई दर फेब्रुवारीतल्या २ पूर्णांक ८१ शतांशवरून खाली येऊन मार्चमध्ये ७६ शतांश टक्के इतका झाला आहे. तर, अन्न निर्देशांकाचा वार्षिक महागाई दर गेल्या महिन्यात ४ पूर्णांक ६६ शतांश टक्के होता, तो या महिन्यात ५ पूर्णांक...

August 1, 2024 9:50 AM

views 36

भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

  भारताची पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं की, देशाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा आहे. मंत्रालयानं सांगितलं की, भारत प्रशांत आर्थिक रचनेतील भारत आणि इतर 13 भागीदारांनी मिळून पुरवठा साखळीतील लवचिकता टिकून राहण्याच्या दृष्टीने समृद्धी करारासाठी भारत प्रशांत आर्थिक रचनेसंदर्भात 3 पुरवठा साखळी संस्था स्थापन केल्या आहेत. मंत्रालयांम सांगितलं की, पुरवठा साखळी परिषदेच्या अध्यक्षपदी अमेरिकेची निवड झाली आहे. आपत्ती निवारण संपर्क यंत्रणेच्...

June 14, 2024 8:25 PM

views 39

भारताच्या घाऊक मूल्य निर्देशांकांवर आधारित चलनवाढीत २ पूर्णांक ६१ शतांश टक्के वाढ

भारताच्या घाऊक मूल्य निर्देशांकांवर आधारित चलनवाढ मे महिन्यात २ पूर्णांक ६१ शतांश टक्के वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. गेल्या पंधरा महिन्यातली ही सर्वाधिक चलनवाढ आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेल, खनिज तेल, अन्नपदार्थ यांच्या किमती वाढल्यामुळे ही चलनवाढ झालेली असेल, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे. मे महिन्यात अन्नपदार्थांच्या किमती ७ पूर्णांक ४ दशांश टक्के तर भाजीपाल्याच्या किमती ३२ पूर्णांक ४२ शतांश टक्के इतक्या वाढल्या आहेत.