September 19, 2024 6:32 PM September 19, 2024 6:32 PM
17
वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं सन्मानित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून जागतिक कृषी पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं. मुंबईत एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.