April 17, 2025 8:32 PM April 17, 2025 8:32 PM
10
SC : वक्फ सुधारणा कायद्यातल्या काही तरतुदींची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्याचे आदेश
वक्फ सुधारणा कायद्यातल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही, असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिस्टिर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारनं सात दिवसात उत्तर सादर करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले. राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ परिषदेवर मुस्लिमेतर व्यक्तींची नियुक्ती करणार नाही, तसंच केवळ वहिवाटीनं आहेत म्हणून, कोणत्याही, अधिसूचनेद...