June 17, 2024 3:26 PM June 17, 2024 3:26 PM

views 26

‘वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वापरलेल्या मोबाईलचा मतमोजणीशी संबंध नाही’

ईव्हीएम, अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, ते कशाशीही जोडलेलं नसतं, असं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघातल्या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी लागणारा मोबाईल शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातलगाकडे असल्याची चर्चा सुरू होती, त्या पार्श्वभूमीवर त्या आज वार्ताहर परिषदेत बोलत होत्या.   जो मोबाईल वापरला गेला तो इनकोर सिस्टीमशी निगडीत होता. त्याचा मतमोजणीशी संबंध नसून डे...