August 1, 2024 2:38 PM August 1, 2024 2:38 PM

views 9

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताच्या स्वातंत्र्य प्रेरणेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज  राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ...