July 29, 2024 4:03 PM July 29, 2024 4:03 PM

views 9

सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून विशेष लोकअदालत सप्ताहाचं आयोजन

सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून विशेष लोकअदालत सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं निकाली काढणं, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू असल्याचं न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. लोकअदालती, न्याय मिळवण्याचा सोपा आणि सुलभ मार्ग असल्यामुळे नागरिकांनी याचा फाय दा घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. या उपक्रमाद्वारे स्वेच्छेनं आणि परस्पर सहमतीनं विवाद मिटवण्याची संधी मिळणार आहे, असंही ते म्हणाले.